नागठाणे : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे कोरोनाच्या निमित्ताने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत भरतगाववाडी आणि कुमठे आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी एक दिवसाचे तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती भरतगाववाडी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. जयपाल निकम यांनी दिली.
या शिबिरात काही तरुणांनी तसेच गावातील दुकानदार तसेच ज्येष्ठ व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. त्यावेळी डॉ. अमोल पाटील, कुमठे येथील आरोग्य सहायक आर. के. मोरे, वाहनचालक सुनील बाकले तसेच ग्रामविकास अधिकारी संजय यादव, सरपंच दीपक शिंदे, सदस्या सुशीला घोरपडे, अंगणवाडी सेविका जयश्री जगताप, अनिता चव्हाण, लेखनिक अंकुश जगतात, शंकर पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे वतीने गावातील किराणा तसेच स्टेशनरी दुकानदार तसेच गावातील तरुण, ज्येष्ठ व्यक्तींना मोफत कोरोना तपासणी शिबिर असल्याचे सांगितले.