बोंबाळे येथे कोरोना केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:40 IST2021-04-23T04:40:51+5:302021-04-23T04:40:51+5:30
मायणी : बोंबाळे येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने येथील ग्रामपंचायत व कर्तव्य ग्रुपने एकत्र येऊन जिल्हा परिषद ...

बोंबाळे येथे कोरोना केअर सेंटर सुरू
मायणी : बोंबाळे येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने येथील ग्रामपंचायत व कर्तव्य ग्रुपने एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे.
यामुळे ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, बोंबाळे याठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावापासून कातरखटाव किंवा वडूज या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना उपचारासाठी जावे लागत आहे.
त्यामुळे सरपंच रेश्मा इंगवले, उपसरपंच बालाजी निंबाळकर, रत्नाबाई निंबाळकर, डॉ. लीना गुरव, डॉ. सुहास घोरपडे, डॉ. मनोज निंबाळकर, डॉ. धनाजी शिंदे, अशोक निंबाळकर, महेश निंबाळकर, रामदास निंबाळकर, गोरख निंबाळकर, अभय शिंदे, अमृत निंबाळकर, शिवलिंग शिंदे, भारत देशमुख, अनिल देशमुख, सुभाष निंबाळकर, महेश निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, अभिजित शिंदे, दत्ता शिंदे, विष्णू शिंदे, रामसर निंबाळकर एकत्र आले.
गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये २० बेडचे कोरोना आयसोलेशन सेंटरची (कोरोना केअर सेंटर) निर्मिती केली. तसेच यासाठी लागणारे सर्व साहित्य ग्रामपंचायत व कर्तव्य ग्रुप यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना केअर सेंटर सुरू आहे, तोपर्यंत होणारा खर्चही संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
फोटो संदीप कुंभार यांनी पाठविला आहे.
बोंबाळे येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्तव्य ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)