कोरोना लागला वाढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:38+5:302021-05-21T04:41:38+5:30
सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ...

कोरोना लागला वाढू
सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतातर कोरोनाचा कहर सुरू आहे.
0000000\
वीज सतत खंडित
सातारा : सातारा शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागातील वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास दोन ते तीनवेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला असून, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.
000
सवयभानचा विसर
सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करुन दिली जात होती. पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.
0000
रस्त्यावर वाहनतळ
सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.
000000
चौकात शतपावली
सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिला जात आहे. पण त्याचवेळी दररोज रात्री अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये शतपावली करण्यासाठी जमत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
00000
जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली
सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळात कोणीही शासकीय कार्यालयात येऊ नये, असे अपेक्षित आहे. तरीही विविध कामांच्या निमित्ताने लोक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये येत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कर्मचारी त्यांना नंतर येण्यास सांगतात.
000000
सोसायट्यांमध्ये वावर
सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तरी विचारणा होत नाही. पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
000000
वीजबिलाची चिंता
सातारा : ग्रामीण भागात वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आता पुन्हा लॉकडाऊन केले असल्याने नागरिक वीजबिल माफ होण्याची वाट पाहत आहेत.