शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

जिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:07 IST

सातारा जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. तर सोमवारी सकाळी अँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरानंतर ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

ठळक मुद्देअँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडलेजिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा : जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. तर सोमवारी सकाळी अँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरानंतर ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.या कोरोना बाधितांत कºहाड तालुक्यात सर्वाधिक २७ रुग्ण आढळून आले. यामध्ये कºहाड शहर ६, उंब्रजला ५, वराडे ४, मलकापूर २, कालवडे २, आगाशिवनगर २, कोळे २, कालगाव १, शामगाव १, कासारशिरंबे १, बेलवडे बुद्रुक १ असे रुग्ण स्पष्ट झाले आहेत. तर फलटण तालुक्यात नवे १७ रुग्ण आढळले. सासवड येथे १, वारेवस्ती खामगाव येथे १०, लक्ष्मीनगर फलटणमध्ये ४, लक्ष्मीवाडी साखरवाडी येथे २ असे हे प्रमाण आहे.

महाबळेश्वर तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील गोडवली येथे ८ आणि भिलारला एक रुग्ण सापडला. खटाव तालुक्यातही वडूज आणि डिस्कळला प्रत्येकी ३ आणि नेर येथे दोघेजण बाधित सापडले.सातारा तालुक्यातील नवीन काही रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सातारा शहरात ३, खिंडवाडी २, खावली १ आणि नागठाणे गणेशवाडीमधील एकाचा समावेश आहे. वाई तालुक्यात शेंदुरजणे ४ आणि बोपेगावच्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. पाटण तालुक्यात नेरले येथे ५ रुग्ण आढळून आले आहेत.

खंडाळा तालुक्यात शिरवळला २ आणि नायगाव येथील १ असे तिघेजण बाधित झाले आहेत. कोरेगाव तालुक्यात बनवडी आणि वाठार किरोलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. तसेच माण तालुक्यातील दहिवडीत आणखी एका रुग्णाची भर पडली.अँटीजन टेस्टचे रुग्ण असे :सोमवारपासून मंगळवारी सकाळपर्यंत अँटिजन टेस्ट्सनुसार १० रुग्ण आढळून आले. यामध्ये जावळी तालुक्यातील दापवडी येथील दोघेजण, साताऱ्यातील शाहूनगरमधील २, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ३, सिध्दांतवाडी येथील २, वाई पोलीस लाईन १ असे हे १० बाधित आहेत.२५५४ कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी अशी :कऱ्हाड - ५३४, सातारा - ४१७, जावली - ३१९, वाई - ३०६, पाटण - १९९, खंडाळा - १९२, फलटण - १९१, खटाव - १३७, कोरेगाव - १११, माण - ८४ आणि महाबळेश्वर तालुका ६४. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर