कोपर्डे हवेली शाळेतील शिक्षिका ‘नेशन बिल्डर’सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:56+5:302021-09-13T04:37:56+5:30
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली, (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुजाता घाडगे, लतिका चव्हाण, रेश्मा भगत, यांनी ...

कोपर्डे हवेली शाळेतील शिक्षिका ‘नेशन बिल्डर’सन्मानित
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली, (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुजाता घाडगे, लतिका चव्हाण, रेश्मा भगत, यांनी शाळेतील व कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीबद्दल रोटरी क्लब मलकापूरतर्फे नेशन बिल्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख एम. आर. सोनवणे, एच. पी. काटे, क्लबचे अध्यक्ष विजय लिंगाडे आदींचा उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवले. त्याचबरोबर घरोघरी जाऊन ऑफलाइन पद्धतीने अध्यापन सुरू ठेवून प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत केला. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य विभागाला ऑनलाइन कामात मदत केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन गुणवंत शिक्षकांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.