रस्ता रुंदीकरणावरून वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:20+5:302021-02-06T05:15:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या प्रयत्नातून मंगळवार पेठ येथील आशीर्वादनगरात विकसित होणाऱ्या रस्त्याला नागरिकांनी ...

रस्ता रुंदीकरणावरून वादावादी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या प्रयत्नातून मंगळवार पेठ येथील आशीर्वादनगरात विकसित होणाऱ्या रस्त्याला नागरिकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. दुपारी या रस्त्याचे काम सुरू असतानाच जोरदार वादावादी झाली. बघ्यांचा जमाव जमल्याने शाहूपुरी पोलिसांना त्यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या भागातील हा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. पालिकेचे अभियंता सुधीर चव्हाण, अतिक्रिमण विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम, भाग निरीक्षक प्रशांत राजेशिर्के पालिकेचा फौजफोटा घेऊन उपस्थित होते. जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होताच स्थानिक नागरिकांनी या कामाला हरकत घेऊन ते बंद पाडायचा प्रयत्न केला.
खासगी मिळकतीमधून रस्ता जात नसल्याने ढोणे यांनी वारंवार समजून सांगूनही वाट मिळत नसल्याने वादावादी होऊन वातावरण तापले. काही केल्या वातावरण शांत होत नाही म्हटल्यावर तिथे बघ्यांची गर्दी वाढू लागली. ही माहिती समजताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी संबंधिताला समज दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले.
फोटो आहे...!