संस्थामातेचे योगदान मोलाचे : घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:04+5:302021-09-07T04:46:04+5:30

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कनिष्ठ ...

The contribution of the mother organization is invaluable: Ghatge | संस्थामातेचे योगदान मोलाचे : घाटगे

संस्थामातेचे योगदान मोलाचे : घाटगे

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सतीश घाटगे म्हणाले, आपल्या अनेक सुखांचा त्याग करून स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचा वटवृक्ष वृद्धिंगत करण्याचे कार्य संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी केले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार’ या उदात्त हेतूने संस्थेची स्थापना केली. संस्थेचा विस्तार केला. हे करत असताना बापूजींना संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये फिरावे लागले. गावोगावी जाऊन संस्थेच्या शाखा उभ्या कराव्या लागल्या. हे पवित्र कार्य चालू असताना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे कार्य संस्थामातेने केले.

यावेळी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी आभार मानले.

फोटो :

कॅप्शन : कऱ्हाड येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांचे भाषण झाले.

Web Title: The contribution of the mother organization is invaluable: Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.