कंत्राटी कोरोना योध्दे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:37+5:302021-09-02T05:24:37+5:30

सातारा : कोरोना संकट निवारणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात ...

Contract Corona Warriors Offensive | कंत्राटी कोरोना योध्दे आक्रमक

कंत्राटी कोरोना योध्दे आक्रमक

सातारा : कोरोना संकट निवारणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात ७९८ जणांना काढण्यात आले आहे. या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी २ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.

याबाबत कोरोना योध्दा कर्मचारी परिषद महाराष्ट्र राज्यच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी गेल्यावर्षी आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिल्या लाटेपासून हे कर्मचारी सेवा देत होते; मात्र, या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. याविरोधात २ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

कंत्राटी कोरोना योध्द्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे, शासनाने कोरोना कर्मचाऱ्यांसाठी घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित दिला जावा, मागण्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत एनआरएचएमप्रमाणे ११ महिन्यांचा सेवा कार्यकाल देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा, कोरोना महामारी संपत नाही, तोपर्यंत योध्द्यांना सेवामुक्त करु नये, थकित मानधनाचा प्रश्न निकाली काढावा, अशा मागण्याही पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

........................................................

Web Title: Contract Corona Warriors Offensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.