साताऱ्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू

By Admin | Updated: June 15, 2017 17:38 IST2017-06-15T17:38:50+5:302017-06-15T17:38:50+5:30

महामार्गावर कारवाई : दीड लाखांचा दंड वसूल

Continuous helmet forced execution of Satara | साताऱ्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू

साताऱ्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू


ूआॅनलाईन लोकमत

सातारा, दि. १६ : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर सातारा पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

 

महामार्गावर ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले असून दुचाकीस्वारांकडून तब्बल दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट सक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी ढिलाई दिल्यानंतर अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच प्रवास करू लागले आहेत. अपघातामध्ये बळी जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले आहेत.

पोलिसांनी शहरात ही कारवाई न करता सुरूवातीला महामार्गावर कारवाईला सुरूवात केली आहे. महामार्गावरून अनेकजण प्रवास करताना हेल्मेट न घालताच प्रवास करत आहेत. अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना आर्थिक बुर्दंड बसत आहे. ही कारवाई महामागार्नंतर शहरातही सुरू करण्यार असल्याचा इशारा दिला पोलिसांनी दिला आहे.

Web Title: Continuous helmet forced execution of Satara