महाबळेश्वरात संततधार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:36+5:302021-09-06T04:43:36+5:30
संततधार कायम महाबळेश्वर : जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा बदल झाला आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावळी व सातारा ...

महाबळेश्वरात संततधार कायम
संततधार कायम
महाबळेश्वर : जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा बदल झाला आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावळी व सातारा तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वरात पावसाबरोबरच थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरू लागली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा शहरात रविवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
तलाव परिसरात
तरुणांची हुल्लडबाजी
पेट्री : महाबळेश्वर, पाचगणी पाठोपाठ आता सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास, बामणोली या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. येथील निसर्गाचा आनंद लुटतानाच काही अतिउत्साही पर्यटकांकडून तलाव परिसरात हुल्लडबाजी केली जात आहे. अनेक पर्यटक सांडव्यावर उभे राहून फोटोसेशन करताना दिसत आहेत, तर काही दुचाकीवरून स्टंटदेखील करीत आहेत. अशा अतिउत्साही पर्यटकांवर आवर घालणे गरजेचे आहे.
नगरपालिकेकडून
औषध फवारणी
सातारा : डेंग्यू, मलेरिया तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुक व धूर फवारणी मोहीम राबविली जात आहे. शहरातील सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ या भागात काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. या भागात धूरफवारणी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. शहरातील सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती, आरोग्य विभागाकडून देण्यात आली.