राष्ट्रध्वजाचा अवमान; व्यवस्थापकावर गुन्हा
By Admin | Updated: February 26, 2015 00:16 IST2015-02-25T21:45:59+5:302015-02-26T00:16:06+5:30
लोणंद औद्योगिक वसाहतीतील घटना

राष्ट्रध्वजाचा अवमान; व्यवस्थापकावर गुन्हा
लोणंद : येथील औद्योगिक वसाहतीतील ‘मुकुंद वायर’ या कंपनीचे व्यवस्थापक आणि संचालकांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद औद्योगिक वसाहतीत मुकुंद वायर लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या आवारात इतर रंगीबेरंगी ध्वजांच्या रांगेत राष्ट्रध्वज शेवटच्या स्तंभावर फडकावून ध्वजसंहितेचा भंग करण्यात आलाअसून, राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे, अशी फिर्याद गणेश अंकुश जाधव (रा. तोंडल) यांनी दिली आहे. कंपनीचे व्यवस्थापक अतुल अरुण जोशी आणि संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, कॉन्स्टेबल आप्पा कोलवडकर अधिक तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)