चिंता न करता चिंतन करावे : गोविंदराज लांडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST2021-05-28T04:28:15+5:302021-05-28T04:28:15+5:30
फलटण: ‘जीवनात मनुष्य सतत कुठली ना कुठली चिंता करत असतो अन् भगवंताचं चिंतन जर का केले तर त्या अचिंत्याचा ...

चिंता न करता चिंतन करावे : गोविंदराज लांडगे
फलटण: ‘जीवनात मनुष्य सतत कुठली ना कुठली चिंता करत असतो अन् भगवंताचं चिंतन जर का केले तर त्या अचिंत्याचा आनंद आपणास मिळतो. म्हणून चिंता जिवंत माणसाला जाळते, तर चिता मेलेल्या माणसाला जाळते म्हणून चिंता न करता चिंतन करावे,’ असे प्रतिपादन सणर गोविंदराज लांडगे यांनी केले.
फलटण येथील लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी महानुभाव पंथातील संत गोविंदराज लांडगे व श्यामसुंदर जामोदेकर यांनी मार्गदर्शन केले. ‘जीवनात मनुष्य सतत कुठली ना कुठली चिंता करत असतो अन् भगवंताचं चिंतन जर का केले तर त्या अचिंत्याचा आंनद आपणास मिळतो. म्हणून चिंता जिवंत माणसाला जाळते, तर चिता मेलेल्या माणसाला जाळते. म्हणून चिंता न करता चिंतन करावे, असे मनोधैर्य मनोबल वाढवून कोविड रुग्णांना एक आधार देत आपल्या व्याख्यानातून अनेक उदाहरणे देत आध्यात्म विज्ञान असे अनेक पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक अनुप शहा यांनी मार्गदर्शनाबद्दल दोघांचेही सत्कार केला.