शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी माशांच्या जीवावर - धोम धरण : दहा किलोचा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:42 IST

धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पांडुरंग भिलारे ।वाई : धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे. धरणात पाणीच शिल्लक नसल्याने उर्वरित पाण्यातूनच पर्यटक रपेट मारण्यासाठी बोटिंग करतात, त्यामुळे पाणी गढूळ होऊन आत असणाºया माशांचा जीव जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता बोटिंग क्लबजवळ दहा ते पंधरा किलोचा मासा मृतावस्थेत धरणाच्या किनाºयावर वाहत आला. त्याला प्रचंड दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने मृत पावून दोन-तीन दिवसांचा कालावधी झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे अनेक मासे मृतावस्थेत त्या पाण्यात असण्याची शक्यता आहे. परंतु धोम पाटबंधारे खात्याच्या गलथानपणामुळे पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहण्यास अडचण येत आहे.

बेसुमार कालव्यात पाणी सोडल्याने धोम धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यातच धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठल्याने किती पाणी शिल्लक आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धरणातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र सध्या धरण परिसरात पाहावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत असल्याने मासेमारी करणारा ठेकेदार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मासेमारी करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मासे मृत पावण्याचे प्रमाण वाढले आहे. जरी मासे पाण्याबाहेर काढल्यास मारून जातात तरीही ते मरणे नैसर्गिक असावे, प्रयोग करून मासे मारण्यात येऊ नयेत. तरी संबंधित विभागाने खासगी बोटिंग क्लबला त्या संदर्भात सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.पाणीपुरवठ्याचीही चिंता..मृत झालेले मासे बाजारात विक्रीसाठी आल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘निपाह’सारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. सध्या धरण परिसरात पाण्याला विशिष्ट असा दुर्गंध येत असून, पर्यटक नाक मुरडताना दिसत आहेत. धोम धरणाच्या पाण्यावर लाखो लोकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा योजना आहेत. गावांना मिळणारे पाणी दूषित मिळाल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन विविध प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळू शकते.धोम धरणाच्या जलाशयात दहा किलोचा मासा मृतावस्थेत आढळून आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण