मसूर : मसूर येथे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३१ रोजी अभूतपूर्व गोंधळ उडाला. गॅस एजन्सीचा कारभार अक्षरशः रस्त्यावर आला. दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर अखेर गॅस एजन्सीची वरात पोलिस स्टेशनच्या दारात पोहोचली. पोलिस ठाण्यातच बैठकीत तोडगा काढण्याची वेळ प्रशासनावर आली. या संपूर्ण प्रकारामुळे एजन्सीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच ग्राहकांनी सिलिंडरसाठी एजन्सीसमोर लांबलचक रांगा लावल्या होत्या. अनेकजण ४५ दिवसांपासून गॅसची प्रतीक्षा करत असल्याने संताप अनावर झाला होता. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी एजन्सी व्यवस्थापनाला जाब विचारताच वादाची ठिणगी पडली. गॅस वितरक व ग्राहकांमधील शाब्दिक चकमकी हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे शटर खाली ओढत गॅस वितरण बंद केले.दरम्यान मसूर पोलीस स्टेशनचे सपोनि. आदिनाथ खरात व त्यांच्या पथकाने घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला. गोंधळाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, माजी सदस्य नंदकुमार जगदाळे, सुदाम दीक्षित, प्रा. कादर पिरजादे, संभाजी बर्गे, बाळासाहेब जगदाळे, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कराड तालुका पुरवठा अधिकारी साहीला नायकवडी, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे व एजन्सी मालक रणजित जाधव यांना तातडीने बोलावून घेतले.यानंतर मसूर पोलिस स्टेशनमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राहकांनी एजन्सीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदिनाथ खरात यांनी गॅस वितरकांना सुनावत बुकिंगनुसार पारदर्शक पद्धतीने वितरण करण्याच्या सूचना दिल्या.
सध्या जवळपास २६०० गॅस बुकिंग प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे ‘पहिले बुकिंग–पहिले वितरण’ या तत्त्वावरच सिलिंडरचे वाटप केले जाणार आहे. - साहीला नायकवडी, पुरवठा अधिकारी कराडगॅस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांच्या असंतोषात आणखीनच भर पडत आहे आज ग्राहकांच्या तीव्र भावना प्रत्यक्ष स्थळी जाणून घेतल्या तदनंतर पुरवठा अधिकारी, पोलिस प्रशासन, इंडेन गॅसचे मालक, ग्राहक व मान्यवरांच्या उपस्थितीत योग्य तोडगा निघाला आहे. - लालासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य मसूर
Web Summary : Masur residents protested against gas shortages, leading to chaos. Frustrated customers confronted the agency, escalating tensions. Authorities intervened, holding a meeting at the police station to resolve the crisis and address distribution issues.
Web Summary : मसूर में गैस की कमी से परेशान लोगों ने विरोध प्रदर्शन किया। ग्राहकों ने एजेंसी का घेराव किया, जिससे तनाव बढ़ गया। अधिकारियों ने हस्तक्षेप कर पुलिस स्टेशन में बैठक की और वितरण संबंधी समस्याओं का समाधान किया।