बांधकाम विभागाच्या कारभाराची भांडाफोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:05+5:302021-03-25T04:38:05+5:30

आदर्की : फलटण तालुक्यातील पश्चिम भागात कामापूर्वीच झळकताहेत फलक, अशी बातमी प्रसिद्ध होताच आदर्की खुर्द येथे डांबरीकरण करून ...

Construction department's scam exposed! | बांधकाम विभागाच्या कारभाराची भांडाफोड !

बांधकाम विभागाच्या कारभाराची भांडाफोड !

आदर्की :  फलटण तालुक्यातील पश्चिम भागात कामापूर्वीच झळकताहेत फलक, अशी बातमी प्रसिद्ध होताच आदर्की खुर्द येथे डांबरीकरण करून फलकावरील काम पूर्ण झाल्याची तारीख काढून टाकल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फलटण पश्चिम भागात जिल्हा परिषद विविध विभागांमार्फत कामे सुरू असताना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने अधिकारी गांधारीची भूमिका घेत असल्याने ठेकेदार लाखोंची कामे आठवड्याभरात उरकतात; परंतु लोकांच्या माहितीकरिता अंदाजपत्रक, खर्च, विभाग, कोणत्या निधीतून काम झाल्याचा फलक लावला जातो; त्यावेळी सुरू व पूर्ण यांचा अवधी फलकावर चार ते पाच महिन्यांचा असतो; तर काम चार दिवसांत पूर्ण झालेले असते, त्यामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत असते. असाच प्रकार आदर्की खुर्द गाव अंतर्गत डांबरीकरण करताना ठेकेदाराने घाईगडबडीत काम उरकताना फलकही काम सुरू दि. ७/३/ २०२१ काम पूर्ण दि. ५/ ३/ २०२१ असा लावला होता, ते लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी खाडाखोड करून काम पूर्ण झाल्याचे दर्शवले. प्रत्यक्षात अंतिम डांबरीकरण, साईडपट्ट्या भरण्याचे काम बाकी होते. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये फलकाच्या फोटोसह बातमी प्रसिद्ध होताच अंतरिम डांबरीकरणात आले व फलकावर काम सुरू दि. ७/९/२०२० व काम पूर्ण दिनांक काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार उघड केल्याने ग्रामस्यांमधून समाधान व्यक्त आहे.

24आदर्की/०१ (दोन्ही घेणे)

फोटो : आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील फलकावरील काम पूर्ण झाल्याचे दिनांक काढून टाकण्यात आले आहेत.

Web Title: Construction department's scam exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.