भक्तवडी फाट्यानजीक अपघातात बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:39 IST2021-01-25T04:39:22+5:302021-01-25T04:39:22+5:30

कोरेगाव : कोरेगाव - वाठार स्थानक रस्त्यावर भक्तवडी फाट्यानजीक ट्रॅक्टरने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीस धडक दिली. या अपघातात कोरेगाव ...

Construction contractor dies in accident near Bhaktawadi Fateh | भक्तवडी फाट्यानजीक अपघातात बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू

भक्तवडी फाट्यानजीक अपघातात बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू

कोरेगाव : कोरेगाव - वाठार स्थानक रस्त्यावर भक्तवडी फाट्यानजीक ट्रॅक्टरने

चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीस धडक दिली. या अपघातात कोरेगाव

येथील शासकीय बांधकाम ठेकेदार विजय आनंदा फडतरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक दत्तात्रय धनसिंग देशमुख (रा. मालगाव, ता. सातारा) याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय फडतरे हे कोरेगावकडे दुचाकी (एमएच ११ बीडब्ल्यू ५९६९) वरून येत होते. भक्तवडी फाट्यानजीक ऊस वाहतुकीच्या

रिकाम्या दोन ट्रॉल्या घेऊन चाललेला ट्रॅक्टर चालक दत्तात्रय देशमुख हा भरधाव वेगात एका वाहनास ओव्हरटेक करत होता. त्याला रस्त्याचा अंदाज न

आल्याने त्याने सरळ फडतरे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात

विजय फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी विकास माने याने फिर्याद दिली असून, ट्रॅक्टर चालक दत्तात्रय

धनसिंग देशमुख (रा. मालगाव, ता. सातारा) याच्या विरोधात कोरेगाव पोलीस

ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष

साळुंखे तपास करत आहेत.

फोटोनेम : २३विजय फडतरे

Web Title: Construction contractor dies in accident near Bhaktawadi Fateh