शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
3
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
4
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
5
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
6
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
7
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
8
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
9
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
10
जळगावात महायुतीचा 'फॉम्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
11
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
12
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
13
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
14
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
15
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
16
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
17
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
18
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
19
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
Daily Top 2Weekly Top 5

'सारथी', 'अण्णासाहेब पाटील महामंडळ' बंद करण्याचे षडयंत्र, नरेंद्र पाटील यांचा आरोप; भुजबळांवर सोडले टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:07 IST

म्हणून भुजबळांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार 

कराड: मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी 'सारथी संस्था' व 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ' पद्धतशीरपणे, टप्प्याटप्प्याने कमजोर व बंद करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. ९ ऑक्टोंबर पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे करणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना पात्रता प्रमाणपत्र (एल वाय) देणे बंद केले आहे. हा त्याचाच एक भाग आहे म्हणून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.शुक्रवारी सकाळी नरेंद्र पाटील यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी कराड येथील मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते.नरेंद्र पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे दीड लाख मराठा उद्योजक बनवण्यात यश आले आहे. भविष्यात ते ५ लाखापर्यंत बनवण्याचे धोरण आहे. मात्र इच्छुक कर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देणे महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बंद केल्याने याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन तीनदा पत्रव्यवहार करून प्रमाणपत्र देणे का बंद आहे हे विचारले असता सॉफ्टवेअर मधील दोष असे एकदा सांगण्यात आले. मात्र पुन्हा केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? त्यांना नेमक्या कुणी काय सूचना दिल्या आहेत का? याबाबत माहिती घेणार आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावर मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निजामांचे गॅजेट, मराठ्यांचे आंदोलन, मराठा समाजासाठी असणारी सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या विरोधात बोलत आहेत. ही बाब चुकीची आहे.

म्हणून भुजबळांच्या पोटात दुखतंय मंत्री छगन भुजबळ हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल चुकीचा प्रचार करत आहेत. खरंतर महामंडळाने कोणालाच कोटींचे कर्ज दिलेले नाही. तर १३ कोटीचा व्याज परतावा दिला आहे. आम्ही सन १९८० पासून लढतोय. आता कोठे सन १७/१८ नंतर मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मात्र मराठा समाजातील उद्योजक उभे रहाताहेत हे पाहून भुजबळांच्या पोटात दुखतंय. आणि याची माहिती त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असणारच अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Plot to shut 'Sarathi', Annasaheb Patil Corporation, alleges Narendra Patil.

Web Summary : Narendra Patil accuses a conspiracy to weaken 'Sarathi' and Annasaheb Patil Corporation. He alleges the corporation stopped issuing eligibility certificates, hindering Maratha entrepreneurs. Patil plans to discuss this with CM Fadnavis, criticizing ministers for opposing Maratha initiatives and Bhujbal for misleading claims.