शरद पवार यांच्याकडून नाईक-निंबाळकर कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:53+5:302021-09-04T04:45:53+5:30
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक-निंबाळकर ...

शरद पवार यांच्याकडून नाईक-निंबाळकर कुटुंबीयांचे सांत्वन
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक-निंबाळकर यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे फलटण येथील ‘सरोज व्हीला’ या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.
त्यानंतर खासदार शरद पवार यांनी त्यांचे सहकारी आणि नुकतेच निधन झालेले पद्मश्री बनविहारी निमकर यांच्या घरी जाऊन निमकर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, बारामती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव व उद्योजिका प्रीती प्रभाकर घार्गे हे उपस्थित होत्या.
०३फलटण-शरद पवार
फलटण येथील दौऱ्यात खासदार शरद पवार यांनी अनंतमालादेवी नाईक-निंबाळकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.