काँग्रेस आमदारांना धक्काबुक्की
By Admin | Updated: February 21, 2017 03:59 IST2017-02-21T03:59:48+5:302017-02-21T03:59:48+5:30
येथे काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील व विरोधी गटाच्या उमेदवारासह त्यांच्या

काँग्रेस आमदारांना धक्काबुक्की
कऱ्हाड (जि.सातारा) : तांबवे (ता. कऱ्हाड ) येथे काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील व विरोधी गटाच्या उमेदवारासह त्यांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी आमदारांच्या सुरक्षारक्षकाने पिस्तूल रोखल्यामुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. जिल्हा परिषदेच्या तांबवे गटातून आमदार पाटील यांचे चिरंजीव प्रताप निवडणूक रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)