शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

By नितीन काळेल | Updated: August 21, 2023 17:54 IST

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली

सातारा : ‘राज्यातील स्थिती बदलली असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. त्यातच महाविकास एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. हे ओळखूनच त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. त्यातूनच शिंदे आणि पवार गट चोऱ्या लपविण्यासाठीच सत्तेत गेले आहेत,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, उदयसिंह पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, धनश्री महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील सरकारमध्ये एक वाक्यता नाही. त्यांनी गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. राज्यात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास भाजप जबाबदार आहे. त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे निश्चीत आहे. कारण, नुकताच कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर भाजपकडे काही राज्यात नेतृत्वच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपचा पराभव नक्की होणार आहे.भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. राष्ट्रवादीची फूट ही दुर्दैवी आहे. भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘राज्यात मागीलवेळी ‘वंचित’मुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला. राज्यातील राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे.या बैठकीत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. तर बैठकीला जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे