शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची उद्या कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार

By प्रमोद सुकरे | Updated: June 1, 2024 13:42 IST

पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेणार आढावा

कराड : वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार "दुष्काळ पाहणी समिती" गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन बैठक रविवारी दि. २ जून रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील सदस्य व पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागवार समिती गठीत केली आहे. यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.दुष्काळ पाहणी समितीमध्ये १३ सदस्य आहेत. यामध्ये आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रमसिंह सावंत, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे, रवींद्र धंगेकर, जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळcongressकाँग्रेस