वडूजमध्ये इंधन दरवाढीविरोधात काॅंग्रेसचे सायकल चालवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:51+5:302021-07-20T04:26:51+5:30
वडूज : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढून काॅंग्रेसकडून निषेध करण्यात आला. तसेच गतीने होणारी करवाढ, इंधन दरवाढ ...

वडूजमध्ये इंधन दरवाढीविरोधात काॅंग्रेसचे सायकल चालवून आंदोलन
वडूज : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढून काॅंग्रेसकडून निषेध करण्यात आला. तसेच गतीने होणारी करवाढ, इंधन दरवाढ होतच राहिली तर लोकांना सायकलशिवाय पर्याय राहणार नसल्याचे दाखविण्यासाठी काॅंग्रेसचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रदेश काॅंग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश गुरव सहभागी झाले होते.
केंद्र शासनाने काही वर्षांपासून दैनंदिन गरजेच्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ सुरू केली आहे. त्याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला केंद्र सरकारने प्रोत्साहनच दिले आहे. या वस्तूंची दरवाढ होण्यास केंद्र शासनाचे चुकीचे धोरणच कारणीभूत आहे. त्याविरोधात देशातील जनता आक्रोश करत आहे. केंद्र शासनाच्या हेकेखोरपणाच्या धोरणामुळेच येथील बाजारपेठेत इंधन दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. या दुपटीने होणाऱ्या दरवाढीने सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वडूज येथील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयावर सायकलसह निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष अशोक गोडसे, संजीव साळुंखे, डॉ. संतोष गोडसे, राजेंद्र खाडे, विजय शिंदे, सचिन घाडगे, अर्जुन गोडसे, मोहन काळे, संतोष भोसले, श्रीरंग देवकर, परेश जाधव, प्रकाश देवकर, संतोष मांडवे, दाऊद मुल्ला, टिलू बागवान उपस्थित होते.
फोटो ..
वडूज येथे सोमवारी इंधन दरवाढीविरोधात सायकल चालवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख सहभागी झाले होते. (छाया : शेखर जाधव)