शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल 

By नितीन काळेल | Updated: February 29, 2024 19:03 IST

हातकणंगेत राजू शेट्टींबद्दल चर्चा; साताऱ्यात तीन जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक 

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी दिली. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सोनलबेन पटेल बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ प्रभारी निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांच्या बैठकीसाठी त्या आल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पटेल यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

काॅंग्रेसच्या सचिव पटेल म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शुक्रवारी पुण्यात इतर तीन जिल्ह्यांची बैठक होत आहे. निवडणुकीत काय काम करायचे, कशी रणनिती आखायची याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने वाॅर रुम तयार केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. आघाडीतून जे उमेदवार असतीत त्यांना विजयी करु. त्याचबरोबर सध्या काँग्रेसला वातावरण चांगले आहे. आमचा पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा आहे. तर सांगली आणि सोलापूर मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार असणार आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस मतदारसंघ मागणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पटेल यांनी पृश्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कोठेही स्वागतच होईल. आजच्या बैठकीत सातारा मतदारसंघाची मागणी झाली नाही. पण, पुण्यातील बैठकीत सातारा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याबाबत आणि पृश्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेल्याच्या प्रश्नावर त्यांनी दबावातूनच राजकीय नेते भाजपात जातात. सध्या दबावाचेच राजकारण सुरू आहे. ही लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. पण, भाजपमध्ये जाणाऱ्यांचे हालच होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नावर पटेल यांनी माढ्याबाबत आमचा विचार नाही. पण, हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहेत. ते महाविकास आघाडीबरोबर आल्यास त्यांना जागा सुटू शकते असे सांगतले. तर गुजरातमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सांगण्यात येते, याबद्दल आपले मत काय ? पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी मी गुजरातची आहे. तेथे बोगस मतदान होते. गुजरात ही भाजपची प्रयोगशाळा आहे. तेथे प्रयोगच होतात, असेही ठामपणे सांगितले.

कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा..साताऱ्यात तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची तयारी आणि आढावा घेण्यात आला आहे, असे सोनलबेन पटेल यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर कोल्हापूरची जागा काँग्रेस लढविणार आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर त्यांनी कोल्हापूरबाबत चर्चा सुरू आहे, एेवढेच उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस