काँग्रेस-भाजप नेते अपक्ष शेळकेंच्या घरी !

By Admin | Updated: April 20, 2016 00:24 IST2016-04-19T22:33:28+5:302016-04-20T00:24:38+5:30

लोणंद नगरपंचायत : सत्तास्थापन करण्यासाठी गुप्त हालचाली सुरू; कौन बनेगा नगराध्यक्ष ?--लोणंद नगरपंचायत

Congress-BJP leaders live in Independent Shekel's home! | काँग्रेस-भाजप नेते अपक्ष शेळकेंच्या घरी !

काँग्रेस-भाजप नेते अपक्ष शेळकेंच्या घरी !

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे आगामी काळात ठरणार असले तरी आत्तापासूनच राजकीय समीकरणे जुळवा-जुळव करण्यासाठी सत्ता संघर्षाला वेग आला आहे. अशातच भाजपा व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांच्या घरी त्यांचा जाऊन सत्कार केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
त्यामुळे आपल्या करिष्म्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या आमदार मकरंद पाटील हे काय जादुई करिष्मा करत राष्ट्रवादीचा पहिला नगराध्यक्ष करतात का? यावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदारांनी कौल दिल्यानंतर सत्तेच्या समीकरणाची जुळवा-जुळव करण्यासाठी राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. लोणंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ८, भाजपा २, काँग्रेस ६ व अपक्ष १ असे बलाबल झाल्याने सत्तेसाठी अपक्षाला अनन्य साधारण महत्त्व येत आहे. अपक्षाने भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवल्याने सध्या अपक्ष ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या तारखेकडे संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष्य लागून
राहिले असून, लोणंदचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार? याची लोणंदकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील व काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांचा धक्कादायक पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेसाठी संघर्ष करायला लावले आहे. तर शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त करत लोणंद नगरपंचायतीमध्ये भाजपाला चंचू प्रवेश जनतेने मिळवून दिला
आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ८, काँग्रेसला ६, भाजपा २, अपक्ष १ असे बलाबल झाल्याने सत्तेच्या
चाव्या अपक्षांच्या हातात आल्या आहेत.
राष्ट्रवादीला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस व भाजपाकडून जोरदार व्यूहरचना आखत घडामोडींना वेग दिला आहे. त्यामुळे प्रभाग ३ चे अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण लोणंदसह सातारा जिल्ह्णाचे लक्ष लागून राहिले
आहे.
एकूणच लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान मिळवत इतिहास घडवून विराजमान कोण होणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना नगराध्यक्ष पदाच्या तारखेकडे लोणंदकरांचे डोळे लागून राहिले आहेत. (वार्ताहर)

कॉँग्रेसकडून अपक्षालाच पदाची आॅफर ?
नगरपंचायतीच्या निवडणुकीत कॉँग्रेसने ६, भाजपने २ तर एका जागी अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. नगरपंचायतीवर सत्ता स्थापनेसाठी ९ जागांची गरज आहे. कॉँग्रेस, भाजप व अपक्ष एकत्र आल्यास राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुळीस मिळू शकते.
या अनुषंगाने कॉँग्रेस व भाजपने हालचाली सुरू केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे झाल्यास कॉँग्रेस कडून अपक्ष उमेदवार सचिन शेळके यांना थेट नगराध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते. सचिन शेळके हे जरी सर्वसाधारण गटातून निवडणूक जिंकले असले तरी ते नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) मोडतात. त्यामुळे अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या असल्याने कॉँग्रेससह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सचिन शेळके यांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. लोणंदला कोणाची सत्ता स्थापन होणार आणि कोणाची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार हे चित्र अजूनतरी अस्पष्टच आहे.

राष्ट्रवादीतर्फे शेळके किंवा क्षीरसागर ...
लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीने या निवडणुकीत सर्वाधिक आठ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला आणखी एका जागेची गरज आहे. निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार सचिन नानाजी शेळके यांच्यावर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. सचिन शेळके यांनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यास राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होऊ शकतो. या बदल्यात शेळके यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते. मात्र, शेळके यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यास नगराध्यक्षपदी प्रभाग एक मधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार हणमंत शेळके तर प्रभाग १६ मधील विजयी उमेदवार योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागू शकते. महिलेला संधी दिल्यास आनंदराव शेळके-पाटील यांच्या पत्नी व माजी सरपंच स्नेहलता शेळके-पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळूू शकते.

Web Title: Congress-BJP leaders live in Independent Shekel's home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.