कॉँग्रेस-भाजप नगरसेवक पिकनिकला ! -कौन बनेगा नगराध्यक्ष ?

By Admin | Updated: April 23, 2016 00:41 IST2016-04-22T22:04:05+5:302016-04-23T00:41:11+5:30

लोणंद नगरपंचायत : सत्तास्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसकडून प्रयत्न; भाजपच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष-

Congress-BJP corporator picnic! Who will become head of the city? | कॉँग्रेस-भाजप नगरसेवक पिकनिकला ! -कौन बनेगा नगराध्यक्ष ?

कॉँग्रेस-भाजप नगरसेवक पिकनिकला ! -कौन बनेगा नगराध्यक्ष ?

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या डावाने वेगळीच कलाटणी घेतल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अपक्ष नगरसेवक सचिन शेळके काँग्रेसच्या गुहेत शिरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली आहे. अपक्षासह काँग्रेस-भाजपचे नगरसेवक लोणंदच्या बाहेर असले तरी भाजपाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने राजकारणात ऐनवेळी टिष्ट्वस्ट होऊ शकतो. लोणंद नगरपंचायतीत सर्वांत जास्त जागा जिंकून राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा दावा केला होता. यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त करण्यासाठी अपक्षाची मदत घेऊन नगरपंचायतीवर पहिल्या सत्तेचा झेंडा रोवण्याचा मनसुबा आखलेला होता. अपक्ष सचिन शेळके हे मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन शेळके यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करणे सहज शक्य असल्याच्याच चर्चा निकालानंतर सुरू होत्या. मात्र मंगळवारी रात्रीपासून अपक्ष नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. गुरुवारी त्यांच्या मातोश्री नागीरबाई शेळके यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिल्यानंतर पडद्यामागच्या खऱ्या घडामोडी राजकीय पटलावर उमटल्या.माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने ‘मास्टर प्लॅनिंग’ करून अपक्षाला भुरळ घातली आणि राष्ट्रवादीला खिंडीत पकडले. त्यामुळे आता नगराध्यक्षासह सत्ता समीकरणाच्या चाव्या आता आमदार जयकुमार
गोरेंनी आपल्या हाती ठेवल्या आहेत, असे म्हटले असले तरी भाजपाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही.
अपक्षाच्या साथीने काँग्रेसने राष्ट्रवादीचा डाव उधळण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सत्तास्थापनेबरोबरच पदांच्या विभागणींचा कोणताच मसुदा अद्यापतरी समोर आलेला नाही. त्यामुळे लोणंदमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांनी आपल्या नगरसेवकांची एक मीटिंग घेऊन घडणाऱ्या घडमोडींवर विचारमंथन केल्याचीही चर्चाआहे. त्यामुळे राष्ट्रवादी यापुढे काय रणनीती आखते याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागलेले आहे. (वार्ताहर)

राजकीय वर्तुळात पडद्याआड घडामोडी
लोणंद नगरपंचायतीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत; पण काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी दोन जागी तडजोड करावी लागणार आहे. तर राष्ट्रवादीला फक्त एका जागी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी राजकीय घडामोडी कोणते वळण घेणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्यातरी ‘राजकीय वर्तुळात पडद्याआड घडामोडी’ अन् बाहेर तारेवरच्या चर्चा यामुळे पहिल्याच नगरपंचायतीचा सत्तेचा खेळ रंगतदार होत चालला आहे.

Web Title: Congress-BJP corporator picnic! Who will become head of the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.