शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

निपाहच्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 19:11 IST

CoronaVirus Satara : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परिसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला या दाव्याबाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनिपाहच्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रमतालुक्यात एकही रुग्ण नाही : शास्त्रज्ञांच्या दाव्याबाबत शंका

अजित जाधवमहाबळेश्वर : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परिसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला या दाव्याबाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे.महाबळेश्वरपासून दहा किलोमीटर अंतरावर मालुसरवाडी हे गाव आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर ह्यरॉबर्स केव्हह्ण नावाची गुहा आहे. याला स्थानिक भाषेत सीमसीम घळ असेही संबोधले जाते. या गुहेत अनेक वर्षांपासून वटवाघळांची वसाहत आहे. वटवाघळांच्या अनेक जाती आहेत; परंतु या गुहेतील वटगाघळ अत्यंत दुर्मिळ आहेत.

मार्च २०२० मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे नमुने गोळा केले. यावर संशोधन करून त्यांनी त्याचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे. या अहवाला नुसार महाबळेश्वरच्या गुहेर असलेल्या दोन वटवाघळांमध्ये निपाह हा अतिघातक व्हायरस सापडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.निपाह हा व्हायरस कोरोना पेक्षा अधिक घातक आहे. कारण कोरोनाचा मृत्यु दर हा दोन टक्के तर निपाहचा मृत्यू दर हा ६५ ते १०० टक्के आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या वृत्तांचे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्या प्रमाणे वटवाघळाते निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही.

निपाह या विषाणुची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही. ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागण देखील या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही. असा दावा या गावचे जेष्ठ नागरिकव माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला... तर गुहा बंद कराकोरोनामुळे महाबळेश्वरची आर्थिक घडी अगोदरीच विस्कटली आहे. त्यातच निपाह विषाणूमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्याची सत्यता पुन्हा तपासून यामध्ये सत्यता असेल तर ती गुहा कायमची बंद करावी, विषाणूा गुहेतून बाहेर येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर