शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Video : शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर गोंधळ, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 11:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी समर्थकांनीच ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती

सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निवडणुकांपूर्वी दोन दिवस अगोदरही आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले होते. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला होता. त्यानंतर, निवडणूक निकालानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी समर्थकांनीच ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव

जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे. 

 

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकbankबँक