शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:14 IST

कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी

ठळक मुद्देभिंत उभारण्यासाठी लागणार पंधरा दिवस कालावधी

सातारा/पेट्री : कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी लागणार असून, या कालावधीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही सर्वात जुनी योजना आहे. एक मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. आतापर्यंत चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन डोझर, दोन रोलर, सात पोकलेन, पंचवीस डंपर तसेच ७५ कर्मचाºयांच्या मदतीने हे काम सुरू आहे. धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाºया पाण्याच्या पाटापर्यंत नवी भिंत उभारली जाणार आहे. या कामामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु पाणीपुरवठा विस्कळीत न करता पर्यायी व्यवस्था करूनच भिंतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘कास धरण ही पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. धरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. भिंतीचे काम सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु या समस्येवर योग्य तो तोडगा काढला जाईल. जीवन प्राधिकरणचे पाणी उपलब्ध झाल्यास ही समस्याही संपुष्टात येईल. कासचे पाणी पंपिंग करून पुुन्हा पाटात सोडल्यास पाणीपुरवठा अखंडित राहू शकतो. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, याची पालिका व जलसंपदा विभागाकडून काळजी घेतली जाणार आहे.पाणीपुरवठा बंद होणार नाही : श्रीकांत आंबेकरज्या बंदिस्त पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या पाईपलाईनच्या कडेला संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दुसरीकडून वळविला जाणार आहे. कासचा पाणीपुरवठा बंद होणार नाही; मात्र तो कमी-जास्त प्रमाणात होऊ शकतो. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत केली आहे. जोपर्यंत कासचे पाणी वळविले जात नाही, तोपर्यंत भिंतीच्या कामास प्रारंभ होणार नाही. उदयनराजे यांनीही संबंधित विभागास याबाबतच्या सूचना केल्या आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी चार दिवस अगोदर पूर्वकल्पना देण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण