विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST2021-03-26T04:38:38+5:302021-03-26T04:38:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवून घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा ...

Confidence in students | विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवून घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन कात्रेरेश्वर विद्यालय, कातरखटावचे मुख्याध्यापक व संपर्कप्रमुख सावता कोरे यांनी केले.

नवमहाराष्ट्र विद्यालय, चितळीतर्फे शाळा भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोरे म्हणाले, ‘कोरोना संसर्ग विचारात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतःची काळजी घेऊन अध्ययन व अध्यापन प्रक्रिया पार पाडावी. पाचवी, आठवी शिष्यवृत्ती व दहावीतील विद्यार्थ्यांना जास्त वेळ ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गदर्शन करून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व शाळा व्यवस्थापन समिती यांना अभिप्रेत असणारे विद्यार्थी घडवण्यासाठी गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. शालेय परिसर व वर्गखोल्यांतील प्रसन्न वातावरण विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविण्यास मदत करते.’

कार्यक्रमात प्रारंभी संपर्कप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक दिलीप सदामते यांच्या हस्ते सावता कोरे व विठ्ठल अथनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनीषा जाधव, सुरेंद्र रायनाडे, विकास पाटील, विजय हांगे, शीलप्रभा निकम, वर्षा गोसावी उपस्थित होते. मुख्याध्यापक दिलीप सदामते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागप्रमुख राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले तर उमेश जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Confidence in students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.