शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन सातारा बसस्थानकात वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: March 7, 2023 19:23 IST

या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली

सातारा : पायाजवळ दुचाकी आणून वाहकाला मारहाण केल्याची घटना सातारा  सस्थानकात दि. ५ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.स्वप्नील अशोक पवार, रोहन अशोक पवार (रा. सहकारनगर, करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहन परशुराम जगदाळे (वय ४५, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे एसटी वाहक आहेत. दि. ५ रोजी दुपारी बसचे चालक किरण वाघ यांच्यासमवेत नाष्टा करण्यासाठी जात होते. त्यावेळी स्वप्नील पवार हा त्यांच्या पायाजवळ गाडी घेऊन आला. त्यावर जगदाळे यांनी ‘थांब जरा माणसे तरी बघा,' असे म्हणाले. यामुळे चिडून ‘थांब तुला दाखवतो,’ असे बोलून तो तेथून निघून गेला. थोड्या वेळाने वाहक जगदाळे व चालक वाघ हे दोघे नाष्टा करून बसजवळ आले.तेव्हा ‘तू खाली ये तुला दाखवतो,’ असे म्हणून बसमध्ये चढू लागल्यावर जगदाळे यांनी प्रवाशांचे तिकीट काढण्याचे थांबवले. ते बसमधून खाली उतरताच स्वप्नील पवार आणि रोहन पवार या दोघांनी जगदाळे यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यानंतर दोघे तेथून निघून गेले. या प्रकारानंतर वाहक मोहन जगदाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक फाैजदार डी. जी. पवार हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस