दहीवडीत अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:21+5:302021-02-21T05:12:21+5:30
दहीवडी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाला आळा घालण्यासाठी शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस दहीवडी व्यापाऱ्यांनी बंद ठेवले असून, तीन ...

दहीवडीत अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण बंद
दहीवडी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाला आळा घालण्यासाठी शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस दहीवडी व्यापाऱ्यांनी बंद ठेवले असून, तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सोमवारचा आठवडी बाजारही बंद राहणार आहे.
त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी मेडिकल, दवाखाने, बँका पतसंस्था वगळून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आज रस्त्यावरही वर्दळ खूप कमी होती, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केल्याने आज मास्क घालूनच नागरिक बाहेर पडत होते. दहीवडीचे नगराध्यक्ष धनाजी जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी दहीवडीतील वाढत्या कोरोनाच्या आकड्यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. या काळात आरोग्य विभाग दहीवडीतील राहिलेल्या कुटुंबाचा सर्व्हे करणार आहे. आज पहिल्याच दिवशी दहीवडीत कडकडीत लाॅकडाऊन पाळण्यात आले. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करावा, तसेच बेफिकिरीने वागू नये, याबाबत जनजागृती करण्यात आली.