शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘पर्ल्स’विरोधात तक्रारींचा ओघ

By admin | Updated: December 12, 2014 23:44 IST

एकूण २१ तक्रारी : फसवणुकीचा आकडा वाढला

सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’विरोधात शुक्रवारी आणखी पाच तक्रारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या सर्वच प्रकरणात झालेली फसवणुकीची रक्कम ३.१0 लाख इतकी आहे. दरम्यान, ‘पर्ल्स’विरोधात आतापर्यंत २१ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, प्रत्येक तक्रारीमध्ये कंपनीचे संचालक, एजंट, यांच्यासह सातारा कार्यालयातील व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारीनुसार फसवणूक झालेली रक्कम बारा ते पंधरा लाखांच्या पुढे गेली आहे.शुक्रवारी ज्या पाच ठेवीदारांनी तक्रार केली त्यामध्ये सुरेश कोडिंबा सकपाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण आणि रक्कम ५0 हजार), संतोष रामचंद्र सकपाळ (रा. बागलेवाडी, ता. पाटण आणि रक्कम पाच हजार), अतुल रामचंद्र येवले (रा. गडकर आळी, सातारा आणि रक्कम ३0 हजार), दत्तात्रय कुंडलिक निकम (रा. साकुर्डी वस्ती, ता. कऱ्हाड, आणि रक्कम दोन लाख), राजाराम कांबळे (रा. मसूर, ता. कऱ्हाड आणि रक्कम ३0 हजार) यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या तक्रारी वेगवेगळ्या स्वरूपात दिल्या असल्या तरी ठेवीची रक्कम वगळता आरोप आणि मजकूर एकच आहे. दरम्यान, या अनुषंगाने आणखी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. पाचही तक्रारदारांनी संचालक तर लोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, बराखांबा रोड, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांच्यासह एजंट, कार्यालय व्यवस्थापक सोनावणे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी या सर्वांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे करत आहेत. (प्रतिनिधी)