जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार
By नितीन काळेल | Updated: June 21, 2023 22:35 IST2023-06-21T22:33:07+5:302023-06-21T22:35:45+5:30
सातारा बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जिवे मारण्याची धमकी; उदयनराजेंसह ४५ जणांच्या विरोधात तक्रार, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नाही...

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार
सातारा - संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी विकसनाचे काम करु न देणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी बुधवारी रात्री तक्रार दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी मुरलीधर भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसळ, सतीश माने, अर्चना देशमुख, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, रंजना रावत, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनूस जेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, संपत महादेव जाधव, शेखर चव्हाण, गितांजली कदम, अश्विनी संतोष गुरव, साैरभ संजीव सुपेकर, प्रवीण धसके, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर गणपत जाधव यांच्यासह इतर १० ते १५ जणांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे.