उत्तर कोरेगावमधील विकासकामांसाठी कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:49+5:302021-09-12T04:44:49+5:30

पिंपोडे बुद्रुक: ‘सातारा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उत्तर कोरेगावमधील प्रत्येक गावात विकासकामे मार्गी लावल्याचे समाधान ...

Committed to development work in North Koregaon! | उत्तर कोरेगावमधील विकासकामांसाठी कटिबद्ध!

उत्तर कोरेगावमधील विकासकामांसाठी कटिबद्ध!

पिंपोडे बुद्रुक: ‘सातारा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उत्तर कोरेगावमधील प्रत्येक गावात विकासकामे मार्गी लावल्याचे समाधान आहे. आगामी काळातही परिसरातील विकासकामांसाठी आपण कटिबद्ध असून, विकासात कुठेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.

सोनके (ता. कोरेगाव) येथे सालपे वाट रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच प्रवीण धुमाळ, माजी उपसरपंच युवराज धुमाळ, स्कूल कमिटी अध्यक्ष संजय धुमाळ, सोसायटी संचालक राहुल धुमाळ, महेश धुमाळ, केशव धुमाळ, मिलिंद धुमाळ, जनार्दन धुमाळ, नवनाथ धुमाळ, सुभाष धुमाळ, शेखर चव्हाण आदी उपस्थित होते.

मंगेश धुमाळ म्हणाले, ‘पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पुरवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. रस्ते, वीज, पाणी, अंगणवाडी, शाळा आदी प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. आगामी काळातही जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक विकासकामे होणार आहेत. प्रत्येक गावाशी आपली नाळ असून, विकासकामात कुठेही कमी पडणार नाही. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ दिला आहे.’

यावेळी जगन्नाथ धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, संबंधित रस्ता दुरुस्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा दळणवळणाचा व शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो -

११पिंपोडे बुद्रुक

सोनके (ता. कोरेगाव) येथे सालपे वाट रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी मंगेश धुमाळ, जगन्नाथ धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, हणमंत धुमाळ, प्रवीण धुमाळ, माजी उपसरपंच युवराज धुमाळ, महेश धुमाळ, केशव धुमाळ, किशोर धुमाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Committed to development work in North Koregaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.