दक्षिण तांबवेत विविध विकासकामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST2021-09-10T04:46:23+5:302021-09-10T04:46:23+5:30

तांबवे : दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या फंडातून विविध विकास कामे मंजूर झाली ...

Commencement of various development works in South Tamba | दक्षिण तांबवेत विविध विकासकामांचा प्रारंभ

दक्षिण तांबवेत विविध विकासकामांचा प्रारंभ

तांबवे : दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या फंडातून विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. या कामांचा नुकताच उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

दक्षिण तांबवे येथील वरकड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा प्रारंभ तसेच जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेतून बांधण्यात येणाऱ्या गटर बांधकामाचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायत सदस्य उत्तम साठे, स्वाती काटवटे, सोसायटी सचिव सुनील पाटील, भास्कर वरकड, जालिंदर मोगरे, प्रल्हाद वरकड, विक्रम पाटील, अनिल पाटील, किरण पाटील, बाळासाहेब वरकड, पंडित पाटील, संपत साठे, भिकाजीराव साठे, दादासाहेब शिंदे, रणजित सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : ०९केआरडी०२

कॅप्शन : दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Commencement of various development works in South Tamba