लोणंदमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:37+5:302021-03-24T04:36:37+5:30
लोणंद : आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांतून साकार होत असलेल्या लोणंदमधील प्रभाग क्रमांक चौदा येथील दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे मराठा ...

लोणंदमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ
लोणंद : आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांतून साकार होत असलेल्या लोणंदमधील प्रभाग क्रमांक चौदा येथील दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे मराठा पतसंस्थेजवळ बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन, लोणंद येथील दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, प्रभाग क्रमांक दहामध्ये रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची येथील नवीन मंजूर शाळा खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन शेळके, उपनगराध्यक्ष किरण पवार, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात, डॉ. नितीन सावंत, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, गटनेते हणमंतराव शेळके, नगरसेविका दीपाली क्षीरसागर, लिलाबाई जाधव, नगरसेवक ॲड. सुभाष घाडगे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, सभापती राजेंद्र तांबे, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, गौरव फाळके, नंदाताई गायकवाड, एन. डी. क्षीरसागर, विनोद क्षीरसागर, नंदकुमार खरात, डॉ. हाडंबर, केंद्रप्रमुख बी. डी. धायगुडे गुरुजी, बबलू मणेर, संभाजी घाडगे, राजू इनामदार, सुभाषराव घाडगे, राजाभाऊ खरात, शिवाजी शेळके, जावेद पटेल, रवींद्र क्षीरसागर, बबलू इनामदार, दादा जाधव, कुर्णे दादा, हेमंत कचरे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, संतोष खरात, शशिकांत खरात, बंटी खरात उपस्थित होते.