सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:55+5:302021-05-23T04:39:55+5:30
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : यशवंतनगर येथील ...

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
मसूर : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, एच. टी. देसाई, मुख्य शेती अधिकारी मोहन पाटील, वसंतराव चव्हाण, संजय चव्हाण, भास्कर कुंभार, नितीन साळुंखे, एम. के. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील गळीत हंगामात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांनी विशेष सहकार्य करून गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला. त्याबद्दल कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी हणमंतराव पाटील, विलासराव थोरात, विश्वास थोरात, सुनील माने, ताजुद्दीन मुल्ला, बाळू फडतरे, आप्पा फडतरे, रवींद्र बगली, तानाजी सुर्वे, भरत साळवे उपस्थित होते.