कापील येथे खडीकरण-डांबरीकरण कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:28 IST2021-02-19T04:28:58+5:302021-02-19T04:28:58+5:30
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने व काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २५ः१५ योजनेअंतर्गत कापील ...

कापील येथे खडीकरण-डांबरीकरण कामाचा शुभारंभ
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने व काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २५ः१५ योजनेअंतर्गत कापील घुमूट मळा ते मलकापूर या रस्त्यासाठी १५ लाख व राकेश पाटील यांचे घर ते कापील गोळेश्वर बेघर वस्तीपर्यंतच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये असा एकूण २५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याचे खडीकरण व डाबरीकरण करण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपसरपंच धोंडीराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, पराग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी कापिल ग्रामविकास पेनेलचे मोहनराव जाधव, वसंतराव देशमुख, भरत पाटील, जयवंत पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब ढेबे, सुभाष पाटील, सुरेश जाधव, संभाजी पाटील, भाऊसों जाधव, प्रल्हाद देशमुख, जयसिंग जाधव, प्रकाश जाधव,आप्पासो जाधव यांच्यासह विविध ग्रामस्थांनची उपस्थिती होती.
फ़ोटो ओळ : कापील (ता.कराड )येथे रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ सरपंच कल्पना गायकवाड उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धोंडिराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, पराग जाधव, सुरेश जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.