बनवडीत अंतर्गत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:44+5:302021-04-08T04:39:44+5:30
यावेळी माजी सरपंच शंकरराव खापे, ग्रामपंचायत सदस्या अलका पाटील, कमल म्हेत्रे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, माजी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ ...

बनवडीत अंतर्गत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
यावेळी माजी सरपंच शंकरराव खापे, ग्रामपंचायत सदस्या अलका पाटील, कमल म्हेत्रे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, माजी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ थोरात, प्रभावती माळी, तुषार पाटील, जयसिंग घाडगे, दीपक डांगे, मयूर भंडारे, दत्ता माळी, विशाल पांढरपट्टे, रामचंद्र कांबळे, संग्राम म्हेत्रे, जी.व्ही. कुलकर्णी, डी.जी. पवार, धोंडीराम माळी, राजू कांबळे, दीपक पाटील, के.जी. पाटील, आर. एस. पाटील, नेताजी जाधव, अरुण माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विभागात विकास कामे करताना गटतट न पाहता, गावचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करतो. ग्रामस्थांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी ग्रामपंचायतीला सांगून कामे करून घ्यावीत. ग्रामहिताचे कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी घ्यावी. बनवडीतील रस्त्याचे काम दर्जेदार करावे. गावाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.
शंकरराव खापे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : ०७केआरडी०२
कॅप्शन : बनवडी, ता.कऱ्हाड येथील अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, शंकरराव खापे यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.