कऱ्हाडला नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:42+5:302021-03-24T04:36:42+5:30

लसीकरणासाठी पालिकेतर्फे मंडप घालण्यात आला असून त्यासाठी अंगणवाडीची जागा आहे, तेथे वेटिंग रूम, निरीक्षण कक्ष तयार केला आहे. मंडपामध्ये ...

Commencement of corona vaccination at Karhadla Civil Health Center | कऱ्हाडला नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ

कऱ्हाडला नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ

लसीकरणासाठी पालिकेतर्फे मंडप घालण्यात आला असून त्यासाठी अंगणवाडीची जागा आहे, तेथे वेटिंग रूम, निरीक्षण कक्ष तयार केला आहे. मंडपामध्ये कुलर, पंख्याची सोय आहे. आतापर्यंत सुमारे पाचशेजणांना कोरोनाची लस दिली असून त्यापैकी १५५ ज्येष्ठ नागरिक, तर ६० जण हायपर टेन्शन व मधुमेहाचे आहेत. कोवॅक्सिन १९ मार्चपासून चालू केले असून त्यामध्ये साठजणांना लस दिली आहे. त्यातील ३४ ज्येष्ठ नागरिक आहेत.

लसीकरण केंद्रास आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्यप्रमुख आर. डी. भालदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल कुलकर्णी व समाजसेवक जयंत बेडेकर उपस्थित होते.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन :

कऱ्हाडच्या नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.

Web Title: Commencement of corona vaccination at Karhadla Civil Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.