आधुनिक विज्ञानाची सुलभ शेतीशी कृषी महाविद्यालयामुळे सांगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:57+5:302021-09-05T04:43:57+5:30

फलटण : ‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्था करण्यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण, दिवंगत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी कृषी क्षेत्राला महत्त्व दिले. ...

The College of Agriculture combines modern science with easy farming | आधुनिक विज्ञानाची सुलभ शेतीशी कृषी महाविद्यालयामुळे सांगड

आधुनिक विज्ञानाची सुलभ शेतीशी कृषी महाविद्यालयामुळे सांगड

फलटण : ‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्था करण्यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण, दिवंगत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी कृषी क्षेत्राला महत्त्व दिले. तो विचार घेऊनच फलटण येथे कामकाज केले जात आहे. आधुनिक विज्ञानाचा आधार घेत शेतीसह दुग्ध व्यवसाय क्षेत्रांमध्ये सुलभ असे कामकाज फलटण कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांचे सुरू आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी काढले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या कार्याचा आढावा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, हेमंत रानडे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, महादेव माने, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, तुषार नाईक-निंबाळकर, दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या जमिनीबाबत काही समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक लावून आगामी काळामध्ये प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू.’

प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या कामाची माहिती दिली. डॉ. शांताराम गायकवाड यांनी शेतीक्षेत्रातील प्रयोगांविषयी माहिती दिली.

यावेळी शरद पवार यांचा संस्थेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

०४फलटण-शरद पवार

फलटण येथील कृषी महाविद्यालयात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते खासदार शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)

Web Title: The College of Agriculture combines modern science with easy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.