कंटेनमेंट झोनमध्ये करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:11+5:302021-03-20T04:39:11+5:30

सातारा : कोविड-१९ आजाराचे प्रतिबंधक उपायोजनामध्ये कंटेनमेंट झोन करणे ही महत्त्वाची बाब आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठीत करण्यात ...

Collector's instructions regarding measures to be taken in the containment zone | कंटेनमेंट झोनमध्ये करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कंटेनमेंट झोनमध्ये करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सातारा : कोविड-१९ आजाराचे प्रतिबंधक उपायोजनामध्ये कंटेनमेंट झोन करणे ही महत्त्वाची बाब आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रभाग समित्या व ग्रामीण भागासाठी गठीत करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समिती आणि संबंधित विभागांनी कसे काम करावे याबाबतचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार कोविड संक्रमित झालेल्या रुग्णांचा परिसर तत्काळ कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून संपूर्ण परिसर सॅनिटायझर करावा. कंटेनमेंट झोन घोषित करतावेळी तेथील परिसर, इमारत, गल्ली इ. चा विचार करून सूक्ष्म कंटेनमेंट झोन घोषित करावा. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबींना मनाई करावी व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडण्याकामी ग्रामस्तरीय, शहरी भागातील समितीने काटेकोरपणे नियोजन करावे. कंटेनमेंट झोन घोषित झालेल्या परिसरामध्ये सर्व घरांचे सर्वेक्षण करावे. यासाठी किमान ३ व्यक्तींचे पथक नेमण्यात यावे आणि प्रत्येक ५ पथकामागे १ पथकप्रमुख नेमण्यात यावे.

कोविड संक्रमित रुग्णांची संख्या ज्या भागात, क्षेत्रात, ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी दैनंदिन पुरवठा करणारे दूध विक्रेता, भाजी विक्रेता, दुकानदार यांची तत्काळ रॅट, आरटीपीसीआर टेस्ट करावी. मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वेळोवेळी हाथ सॅनिटाईझ करण्याबाबत प्रबोधन करावे आणि जे नागरिक नियम पाळत नाहीत, अशा नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. घर टू घर सर्वेक्षण करतावेळी गरोदर स्त्रिया, दुर्धर आजार, आयएलआय, सारी रुग्ण यांची वर्गवारी करून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करावे.

घोषित करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनबाबत आवश्यक ती स्वच्छता राखणे, वेळोवेळी परिसर सॅनिटराईज करण्यात यावा. घर टू घरमध्ये सर्वेक्षण झालेल्या नागरिकांची माहिती त्या त्या कार्यक्षेत्राचे वैद्यकीय अधिकारी यांना तत्काळ अद्ययावत करावी, असे परिपत्रकात जिल्हाधिकारी शेखर‍ सिंह यांनी नमूद केले आहे.

Web Title: Collector's instructions regarding measures to be taken in the containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.