पत्रकारांसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:20 IST2015-07-05T21:57:30+5:302015-07-06T00:20:20+5:30

फलटणला महाआरोग्य शिबिर : संरक्षण, पेन्शन योजनेसाठी प्रयत्नशील; रामराजे

Collecting all-party leaders for journalists | पत्रकारांसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र

पत्रकारांसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र

फलटण : ‘देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेत काम करणाऱ्या फलटणच्या आॅल इंडिया रिपोर्टर संघटनेने समाजकार्याची छाप जनमानसात उमटवली आहे. या संघटनेने पत्रकार संरक्षण व पेन्शन योजनेच्या कायद्याच्या केलेल्या मागणी संदर्भात आपण राज्य सरकारशी चर्चा करणार आहे,’ असे मत विधिमंडळाचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या आॅल इंडिया रिपोर्टर असोसिएशन या संघटनेच्या उद्घाटन व मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार हिंंदुराव नाईक-निंंबाळकर होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, रणजितसिंह नार्ईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘पत्रकार संघटनेने आरोग्य सेवा करून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजमान उंचावणे व त्यांची सेवा करणे हेच उद्दिष्ट ठेवल्याने आॅल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा नावलौकिक लवकरच सातारा जिल्ह्यात समाजसेवेमध्ये भूषणवाह ठरेल.’
‘युवक पत्रकारांचे संघटन करून या संघटनेने समाजसेवोचा वसा जपण्याचे व पत्रकारितेत सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत धडपड करण्याची वृत्ती व मानसिकता जपूनच खऱ्या अर्थाने पत्रकारिता करावी. येथून पुढे या संघटनेला सर्वतोपरी मदत आहे,’ अशी ग्वाही माजी खासदार हिंंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दिली .
यावेळी सचिन बेडके, दिगंबर आगवणे, रवींद्र बेडकिहाळ, पै. बजरंग गावडे, अनुप शहा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अपर्णा रोकडे व केशव खोमणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आॅल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष युवराज पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नीलम देशमुख व राजश्री शिंंदे यांनी सूत्रसंचालन केले. बापूराव जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष यशवंत खलाटे-पाटील, राजेंद्र पोरे, समाधान कळसकर, किसन भोसले, संदीप कदम, इम्तियाज तांबोळी, बाळासाहेब ननावरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

महाआरोग्य तपासणी शिबिरात ५५६ रुग्णांनी तपासणी करून यातील ३५ रुग्णांना शस्त्रक्रियेच्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. नेत्रशिबिरात २२४ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यामध्ये ३५ मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Web Title: Collecting all-party leaders for journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.