ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

By Admin | Updated: March 20, 2016 00:25 IST2016-03-20T00:24:29+5:302016-03-20T00:25:30+5:30

शिरवळमधील घटना : नऊ जणांवर गुन्हा

The collapse of the transport company's office | ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

शिरवळ : मालट्रक मालकांना भाडे वाढवून देत नाही व पोलिस स्टेशनला तक्रार करता, असे सांगून शिवीगाळ करत ट्रान्सपोर्ट कार्यालयाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून खंडाळा तालुका वाहतूक असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी कंपनीना मालट्रक पुरवठा करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे वाहतूक व्यवस्थापक लाल बाबू गुप्ता हे व इतर कर्मचारी असताना त्याठिकाणी खंडाळा तालुका वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष विजय यशवंत नेवसे, उपाध्यक्ष युवराज ढमाळ, पिंटू पीरजादे, गणेश यादव, जाधव व इतर चार ते पाचजण कार्यालयात आले.
यावेळी त्यांनी ‘आमच्या संघटनेच्या मालट्रक मालकांना भाडे वाढवून देत नाही व उलट आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करता, तुम्ही आत्ता येथे धंदा करायचा नाही,’ असे धमकावत युवराज ढमाळ, विजय नेवसे व पिंटू पीरजादे यांनी हातात दांडके घेऊन कार्यालयातील मधील चार संगणक, दोन प्रिंटर व केबीनची तोडफोड केली. तसेच लाल गुप्ता व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत निघून गेले. या घटनेत संबंधित कार्यालयाचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून निघून जाताना संबंधितांनी या कार्यालयाजवळ असणाऱ्या आणखी एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
याबाबतची फिर्याद वाहतूक व्यवस्थापक लाल गुप्ता यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी विजय यशवंत नेवसे, युवराज ढमाळ, पिंटू पीरजादे, गणेश यादव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पोपटराव कदम हे करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The collapse of the transport company's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.