शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 2:18 PM

कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवरपाण्याचा विसर्ग सुरुच : कृष्णा, कोयना नद्यांना पूर

सातारा : कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे.कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. शुक्रवारी आठ वाजेपर्यंत कोयना धरण परिसरात ८७ मिली मीटर पाऊस झाला.

धोम धरणातून ४४. ५९ क्युसेक, कण्हेरमधून ५१.0९ क्युसेक, उरमोडीतून १,४३६ क्युसेक, बलकवडीतून २,१८३ क्युसेक, तारळीमधू १,0१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

धरणांतील पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील पाणी काठावरील सखल भागात पसरत असल्याने या भागात राहणाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या चोवीस तासांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १ हजार २५४ मिली मीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात आजअखेर १६ हजार ४0९ मिली मीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिली मीटरमध्ये असा : महाबळेश्वर १२३.८८, सातारा ११.४३, जावळी २९.१२, पाटण २२.७३, कऱ्हाड ९.४६, कोरेगाव २.६७, खटाव १.९७, खंडाळा 0.५५, वाई ४.२९.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर