शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
3
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
4
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
5
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
6
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
7
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
8
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
9
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
10
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
11
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
12
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
13
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
14
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
15
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
16
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
17
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
18
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
19
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
20
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खते बनवण्याच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठा, कऱ्हाडच्या तासवडे औद्योगिक वसाहतीत ६ कोटींचे कोकेन जप्त

By प्रमोद सुकरे | Updated: May 23, 2025 14:28 IST

तपास सुरू, आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता

प्रमोद सुकरे कऱ्हाड: तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तळबीड पोलिसांनी शुक्रवारी (२३ मे) अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ या कंपनीमधून तब्बल १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने याची किंमत सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ ( वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (मल्हारपेठ ता. पाटण,) जीवन चंद्रकांत चव्हाण ( आवार्डे ता. पाटण) विश्वनाथ शिपणकर (दौंड जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.कंपनीच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठातासवडे एमआयडीसीमधील बी-५६ ब्लॉकमध्ये ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ ही कंपनी आहे. ही कंपनी शेतीसाठी खते तयार करते. असा मुखवटा वापरून तिथे अवैधपणे कोकेनचा साठा केला जात होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तातडीने नियोजनबद्ध कारवाई केली आणि कंपनीवर छापा टाकला. या वेळी अति सावधगिरीने परिसराची झडती घेण्यात आली. छाप्यात पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या स्वरूपात १२७० ग्रॅम कोकेन मिळून आले, जे तांत्रिक चाचणीद्वारे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.तपास सुरू, आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यताया कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीतील संबंधित पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे कोकेन कुठून आणले गेले, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या हेतूने येथे साठवले गेले, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातात सापडलेल्या पुराव्यांवरून हे कोकेन विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. यामध्ये आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडMIDCएमआयडीसीPoliceपोलिस