सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा काळमवाडी येथे प्रचार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST2021-06-09T04:48:54+5:302021-06-09T04:48:54+5:30
नेर्ले : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानासाहेब महाडिक गटाच्या सहकार पॅनेलच्या उमेदवार इंदुमती दिनकर जाखले यांच्या प्रचाराचा प्रारंभ ...

सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा काळमवाडी येथे प्रचार प्रारंभ
नेर्ले : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानासाहेब महाडिक गटाच्या सहकार पॅनेलच्या उमेदवार इंदुमती दिनकर जाखले यांच्या प्रचाराचा प्रारंभ काळमवाडी येथे काळम्मा देवीच्या प्रांगणात करण्यात आला. डॉ. सुरेश भाेसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलमध्ये जाखले या महाडिक गटाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
या वेळी वैभव जाखले, संचालक गिरीश पाटील, माजी सरपंच जयकर कदम, सरगम मुल्ला, जागर पाटील, हर्षवर्धन पाटील, सर्जेराव चव्हाण, पी. वाय. पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, सुनील पाटील, दादा ताटे, दिलीप पाटील, हणमंत पाटील, पैलवान बबन शिंदे आदींसह सभासद उपस्थित होते.
०७०६२०२१-आयएसएलएम-नेर्ले कृष्णा कारखाना न्यूज
काळमवाडी (ता. वाळवा) येथे महाडिक गटाच्या सहकार पॅनेलच्या उमेदवार इंदुमती दिनकर जाखले यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी वैभव जाखले, गिरीश पाटील, जयकर कदम, सरगम मुल्ला उपस्थित होते.