शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2023 13:24 IST

रुग्णांसोबत मनमोकळा सवांद साधला .!

लोकमत न्यूज नेटवर्क,  पाचगणी, (दिलीप पाडळे): मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत अर्थसाह्यतून मोफत उपचारार्थ जीवनदान लाभलेल्या बाल चिमुकल्या  रुग्णांसोबत  वर्षा निवासस्थानी माननीय  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी फराळ केला त्याचं बरोबर या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तर या रुग्णांना दिवाळी गिफ्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बाल रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता..!

मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाह्य मिळून उपाचारातून बरे झालेल्या रुग्णांच्या करीता हा दिवाळी फराळ कार्यक्रम मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आयोजित केला होता. मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी आयोजित दिवाळी फराळ  कार्यक्रमात. यावेळी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजारातून बरे झालेले छोटे बाल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत दिवाळी फराळ केला. तसेच या रुग्णांच्या सोबत दिलखुलास संवाद साधला यावेळी उपस्थित रुग्णांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट हम्पर  देण्यात आले. 

या दिवाळी फराळ कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे, डॉ. मिलिंद शिंदे तसेच अनेक रुग्णसेवक, रुग्ण दाते उपस्थित होते.  डॉ. मिलिंद शिंदे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील रामवाडी गावचा यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपचारार्थी  बालरुग्ण चिमुकला  कु. आरूष संदीप सणस  हा पूर्णतः बरा झाला असून याला सुद्धा मुख्यमंत्री फराळा करीता निमंत्रित करण्यात आले होते. 

यावेळी बोलताना डॉ. मिलिंद शिंदे म्हणाले की, वाई, जावळी, महाबळेश्वर, तसेच सातारा जिल्ह्यातील  रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा विनियोग करून घ्यावा. त्याकामी सर्वोतोपरी सहकार्य मी स्वतः करणार आहे. फक्त रुग्णांनी पुढे या रुग्णसेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केलं आहे. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदे