बंद, निषेध मोर्चा अन् घोषणा...
By Admin | Updated: June 2, 2014 01:19 IST2014-06-02T00:59:52+5:302014-06-02T01:19:59+5:30
शांततेचे आवाहन : कºहाड व पाटण तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको अन् सभा

बंद, निषेध मोर्चा अन् घोषणा...
कºहाड : सोशल मिडीयाद्वारे राष्ट्र पुरुषाचा अवमान केल्याची घटना समजल्यानंतर कºहाड शहरासह तालुक्यातील मलकापूर, उंब्रज, वडगाव हवेली आदी गावांमध्ये संतापाची लाट उसळली. शनिवारी रात्री उशिरा कºहाड शहर व तालुका पोलीस ठाण्यांसमोर युवकांचा मोठा जमाव जमला. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रविवारी दिवसभर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी रास्ता रोको, मोर्चा, निषेध सभा घेण्यात आल्या. कºहाडसह उंब्रज, मलकापूर व वडगाव हवेली येथे शनिवारी रात्रीपासूनच तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. रात्री उशिरा हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रविवारी सकाळी हिंदू एकता आंदोलनचे विनायक पावसकर, नगरसेवक विक्रम पावसकर, भाजपाच विष्णू पाटसकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी व अन्य नागरिक यांची कºहाड शहर पोलिस ठाण्यात बैठक झाली. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह तहसीलदार सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर विनायक पावसकर, विक्रम पावसकर, विष्णू पाटसकर यांच्यासह युवकांनी दत्त चौक येथे जाऊन ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या. चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. अभिषेकानंतर विनायक पावसकर यांच्यासह वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी युवकांना शांततेचे आवाहन केले. मोर्चात शेकडोे युवक सहभागी झाले होते. काही युवक दुचाकीवरून फेरी मारत मोर्चामध्ये सहभागी झाले. हा मोर्चा दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा मार्गे पांढरीच्या मारूती मंदिरापर्यंत नेण्यात आला. (प्रतिनिधी)