अर्कशाळानगरमध्ये बंद फ्लॅट फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:46+5:302021-02-05T09:10:46+5:30
सातारा : येथील शाहूपुरीतील अर्कशाळानगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अधिक माहिती अशी, ...

अर्कशाळानगरमध्ये बंद फ्लॅट फोडला
सातारा : येथील शाहूपुरीतील अर्कशाळानगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत अधिक माहिती अशी, महेश अशोक चिकणे (वय ३५, मु. पो. गांजे, ता. जावळी, सातारा) हे अर्कशाळानगर, शाहूपुरी, सातारा येथे राहतात. गुरुवार, दि. २१ रोजी रात्री आठ ते मंगळवार, दि. २६ रोजी सकाळी साडेसात या वेळेत त्यांचे घर बंद होते. या कालावधीत त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सात हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील डूल, तीन हजार रुपये किमतीचे डूल, चार हजार रुपये किमतीची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पुतळी, असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. महेश चिकणे हे मंगळवारी घरी आले असता त्यांना घरफोडी झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
याबाबत अधिक तपास हवालदार हसन तडवी करीत आहेत.